जालना: सर्वांना सोबत घेऊन तणावमुक्त वातावरणात काम करणार - सीईओ कृष्णकांत कनवारिया यांचा मनोदय
Jalna, Jalna | Apr 9, 2026 जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार्या केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व अधिकारी व कर्मचार्यांना सोबत घेऊन तणावमुक्त वातावरणात करण्यात येईल,असा मनोदय जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांनी गुरुवार दि.9 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता व्यक्त केला. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम.यांच्या जागी कृष्णकांत कनवारिया यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध विभागात भेट दिली.