दारूच्या बाटल्या खांद्यावर घेऊन निघालेल्या तरुणाला पोलिसांनी सापळा रचत लालडोंगरी भागात रंगेहात पकडले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चामोर्शी तालुक्यात कामराज गुंतीवार हा युवक आपल्या खांद्यावर दारूच्या बाटल्या घेऊन जात असताना लाल डोंगरी भागात चामोर्शी पोलिसांनी सापा रचत सदर युवकाला मुद्देमालासह रंगेहात पकडले आहे. या कारवाई त बारा हजार रुपये किमतीचे विदेशी दारू पकडण्यात आली आहे.