पाथ्री: रेणापूर शिवारातील शेत आखाड्यावरून अज्ञात चोरट्यानी सोयाबीन केले लंपास पाथरी पोलीसात गुन्हा दाखल
पाथरी तालुक्यातील रेणापूर शेतशिवारात गट क्र. 465 मधील शेत आखाड्यावरून अज्ञात चोरट्यांनी सोयाबीन ढिगामधील 3 ते 4 थैल्या सोयाबीन चोरून त्यांच्याकडील वाहनात टाकुन पळून गेल्याची घटना आज गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12 30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामप्रसाद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात पाथरी पोलीस ठाण्यात आज सकाळी 7 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.