औसा: सरदार वल्लभाई पटेल जयंती निमित्त औसा येथे ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन, सहभागी होण्याचे औसा पोलिसांचे आवाहन
Ausa, Latur | Oct 30, 2025 औसा – देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रrवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. याच औचित्याने औसा पोलीस ठाण्याच्या वतीने “ रन फॉर युनिटी ” या एकात्मतेच्या धाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही धाव सकाळी 7.15 वाजता औसा पोलीस ठाण्यापासून सुरु होऊन हनुमान मंदिरापर्यंत जाईल आणि तेथून पुन्हा पोलीस ठाण्यात संपन्न होईल.लातूर जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.