भंडारा: वैनगंगा नदीत आढळले कुजलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचे प्रेत; ओळख पटविण्याकरिता कारधा पोलिसांचे प्रयत्न सुरू
भंडारा तालुक्यातील कारधा येथील वैनगंगा नदीच्या पुलाजवळ नदीच्या काठावर एका अनोळखी पुरुषाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सार्थिका संजय गजभिये (वय ५२, रा. आजिमाबाद) यांना दि. १८/११/२०२५ रोजी सकाळी ९:३० वाजण्यापूर्वी गावातील लोकांकडून वैनगंगा नदी, कारधा येथील मोठ्या पुलाजवळील काठावर एका अनोळखी पुरुषाचे कुजलेले प्रेत तरंगताना दिसल्याची माहिती मिळाली. या खबरेवरून लोकांनी घटनास्थळी जाऊन..