या सभेत शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने टी. ई. टी. बाबत, जुनी पेन्शन, संच मान्यतेबाबत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पोस्ट मॅपिंग, शालार्थ आय. डी., थकीत वेतन, अनुकंपा नियुक्ती, वैद्यकीय देयके, वरिष्ठ व निवड श्रेणी, पदवीधर मतदार नोंदणी तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रलंबित असलेल्या समस्या निकाली काढण्यासाठी संघटनेची पुढील रणनीती ठरविण्यात आली. शिक्षण उपसंचालक यांचेकडे न सुटलेल्या समस्या शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या सोबत पुढील महिन्यात होणाऱ्या