'जयजयकार करू अहिल्यादेवीचा... जयजयकार करू अहिल्यानगरीचा...' या गीतास अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत गौरव गीत म्हणून मान्यता द्यावी. ‘माझा जिल्हा, माझा अभिमान’ ही भावना सर्व नागरिक, युवक व लहान विद्यार्थी यांच्यात रुजून वृद्धींगत व्हावी यासाठी हे गीत जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापने, सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये वाजवण्यात यावे, या मागणीचे निवेदन अहिल्यानगर गौरव गीत समितीचे गौतम मुनोत व विचार भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी पंकज आशिया यांन दिले