कामठी येथील टेलर्स कॉलनी, दाल ओली क्र. २ स्थित छत्री समाज विठ्ठल रुखमाई मंदिर समितीच्या वतीने बुधवार, १४ जानेवारी 'मकरसंक्रांती पोंगल महोत्सवाचे' भव्य आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल होती. शेकडो भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली यावेळी भव्य शोभायात्रा देखील काढण्यात आली होती.वर्षातील हा पहिला सण उत्साहात साजरा करण्यात आला.