परभणी: शिर्शी रेनकापूर येथे मुसळधार पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने संसारउपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान
परभणी तालुक्यातील शिर्शी रेनकापूर येथे मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याने घरातील धान्यसाठा, पलंग, कपडे, आदी संसारउपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संपूर्ण गावात पाणी साचल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने शिर्शी रेनकापूर येथील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांनी आज बुधवार 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता केली आहे.