पनवेल: नेरूळमध्ये पोलिसांनी ऑलआऊट ऑपरेशनअंतर्गत
तीन आरोपींना तसेच तीन बांगलादेशी नागरीकांना अटक केली.
Panvel, Raigad | Apr 6, 2024 नेरूळ पोलिसांनी नेरूळ विभागात दिवसभर ऑपरेशन ऑलआऊट मोहिम राबवली. या मोहिमेत उघड्यावर नशापाणी करणारे, मद्यपान करणे, तडीपार गुंड अशा तीन गुन्हेगारांना विविध विभागातून अटक केली. तर नेरूळ सेक्टर २० येथून तीन बांगलादेशी नागरीकांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती ५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. प्रेस नोटद्वारे पोलिसांनी दिली.