आष्टी: पाच वर्ष बंद ठेवल्याने कडा येथील कारखाना बंद पडला,माझा काहीही संबंध नाही आमदार सुरेश धस यांचे धोंडे यांना उत्तर
Ashti, Beed | Nov 1, 2025 कडा येथील महेश सहकारी साखर कारखाना याचा परवाना शासनाने रद्द केला आहे. मात्र हा कारखाना बंद पाडण्यामध्ये आमदार सुरेश धस यांचा वाटा आहे. असा आरोप बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केला होता. मात्र सदर कारखाना गेल्या पाच वर्षात बंद असल्यामुळे बंद पडला आहे त्यामागे माझा कोणताही संबंध नाही .असे उत्तर माजी आमदार भीमराव धोंडे यांना आमदार सुरेश धस यांनी दिले आहे.