जळगाव: भुसावळात सिंधी समाजाचा एल्गार; भगवान झूलेलाल यांच्यावरील वक्तव्यावरून अमित बघेल यांच्या विरोधात तीव्र आंदोलन
सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल यांच्याविषयी छत्तीसगड येथील 'जोहार पार्टी'चे प्रमुख अमित बघेल यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यासाठी भुसावळ शहरातील सिंधी समाज बांधवांनी मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्रांत कार्यालयाबाहेर जोरदार धरणे आंदोलन केले.