जालना: जुना जालना भागात वारंवार वीज खंडित; नागरिक हैराण
स्वतंत्र वीजपुरवठ्याची मागणी, गणेश सुपारकर आक्रमक
Jalna, Jalna | Apr 3, 2026 आज दिनांक 3 फेब्रुवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जुना जालना भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत. अचानक वीजपुरवठा खंडित होणे, कमी-जास्त दाबाने वीज येणे आणि दीर्घकाळ लोडशेडिंगसारखी परिस्थिती निर्माण होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते गणेश सुपारकर यांनी महावितरण प्रशासनासह लोकप्रतिनिधींवरही निशाणा साधत, जुना जालना भागासाठी स्वत