शेगाव: अपंग महिलेस एका इसमाने वाद घालून मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना मिल्लत नगर येथे घडली
अपंग महिलेस एका इसमाने वाद घालून मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना मिल्लत नगर १३ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत शाहीन बानो साहिल शाह वय 39 वर्ष रा. मिलत नगर यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, शेख नज्जू (पूर्ण नाव माहित नाही यांनी असे म्हटले की तुम्ही लावलेली केबल डिश काढून टाका असे म्हणून शिवीगाळ केली चापटा बुक्क्यांनी मारहाण करुन जीवाने मारण्याची धमकी दिली तसेच किराणा सामानाचे नुकसान केले.