हिंगोली: दिवाळी सणानिमित्त अन्नपदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी अन्न व औषध प्रशासन विभागाचे नागरिकांना आवाहन
हिंगोली दिवाळी सणासाठी जनतेकडून मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थाची खरेदी करण्यात येते. अशावेळी अन्नपदार्थांमध्ये भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढते अशा प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी व जनतेस निर्भेळ अन्न मिळवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद चौधरी यांनी दिवाळीच्या सणानिमित्त अन्नपदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी असे जिल्ह्यातील नागरिकांना आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता आवाहन केले आहे.