अकोट: Akot Breaking..!
सकल आदिवासी बांधवांचा आरक्षण बचाव मोर्चा;हजारो आदिवासी बांधव उपविभागीय कार्यालयावर धडकले
Akot, Akola | Oct 14, 2025 अकोला जिल्ह्यातील सर्व सकल आदिवासी समाज संघटना एकत्रित येऊन अकोट येथे आज सकल आदिवासी समाजाचा आदिवासी उलगुलान महामोर्चा रेल्वे स्टेशन ते उपविभागीय विभागीय अधिकारी कार्यालय अकोट येथे करण्यात आले होते. बंजारा आणि धनगर समाजाने आदिवासी आरक्षणाची मागणी केली त्या विरोधात अकोला जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातील इतर लागुन असलेल्या जिल्ह्यातील आदिवासी जनसमुदाय या ठिकाणी जमला होता.आदिवासी समुदायातील संपूर्ण जमातीनी त्यांची वाद्य संस्कृती पोशाख राहणीमान या सर्वांचं दर्शन मोर्चात झाले.