गोंदिया: कटंगी शिवारात दोन ट्रकची आमोरासमोर धडक, अपघातात ट्रक चालक युवकाचा मृत्यू
Gondiya, Gondia | Oct 19, 2025 गोंदिया बालाघाट मार्गावर दोन ट्रकची आमोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एका ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्यु झाला. सदर घटना दिनांक 18 ऑक्टोबरच्या पहाटे पाच वाजेच्या सुमारास गोंदिया शहरापासून काही अंतरावर असलेल्या कटंगी शिवारात घडली. नितेश वैद्य राहणार तिरोडा असे मृतकाचे नाव आहे. गोंदिया बालाघाट मार्गाने नितेश वैद्य हा ट्रक घेऊन बालाघाटच्या दिशेने जात होता. दरम्यान कटंगी नागरा शिवारात दोन्ही ट्रक आमोरासमोर धडकले.