लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपरिषदांसाठी शांततेत मतदान उ, अहमदपूरमध्ये 73..06 टक्के मतदान जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांमध्ये आज (ता. 02) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान झाले. सर्वच मतदान केंद्रावर शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये उदगीरमध्ये 68.12 टक्के, अहमदपूरमध्ये 73.06 आणि औसामध्ये 75.73 टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला.