समुद्रपूर: शहर पोलिसांची दारू वाहतूकी विरोधात तिन ठिकाणी कारवाई:५ हजार ३०० रुपये किमतीची देशी व गावठी दारू जप्त
समुद्रपुर पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक कारवाई करीत शहरातील आठवडी बाजार, कानकाटी, आणि लाहोरी याठिकाणी कारवाई करीत ५ हजार ३०० रुपये किमतीची देशी व गावठी दारू जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली असून यासंबंधी तिन्ही दारू वाहतूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हि कारवाई ठाणेदार रविद्र रेवतकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अनिल देरकर, पोलिस कर्मचारी कपिल मेश्राम यांनी केली आहे.