10 जानेवारीला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे पाचपावली हद्दीतील देवी नगर येथे राहणारा कुख्यात गुन्हेगार सन्नी मखीजा याच्या विरोधात पोलीस स्टेशन पाचपावली येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. दरम्यान पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक तीन यांनी आरोपीला नागपूर शहर व नागपूर ग्रामीण हद्दीतून एका वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. आरोपीला हद्दपार करून भंडारा येथे पाठवण्यात आले आहे.