तिरोडा: अवकाळी पावसामुळे धानपिकांचे मोठे नुकसान; त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आमदार विजय रहांगडाले यांचे निर्देश
Tirora, Gondia | Oct 31, 2025 मागील पंधरा दिवसांपासून तिरोडा तालुक्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडले आहे. ऐन कापणीच्या वेळी आलेल्या या पावसाने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, शेतात उभे असलेले पीक पाण्यात गेले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी प्रशासनाला त्वरित कारवाईचे निर्देश दिले आहेत.