वरोरा तालुक्यातील जामगाव बुद्रुक येथे सोयाबीन पिकाच्या नाशामुळे झालेल्या आर्थिक संकटातून घायाळ झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी आज दि 15 ऑक्टोबर 12 वाजता मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना सांत्वन दिले.जामगाव बुद्रुक येथे राहणारे केशव देवराव आसुटकर या शेतकऱ्याने गेल्या दोन दिवसापूर्वी शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करत असताना पिकाचे दाणे काळे पडलेले पाहिले. पीक नष्ट झाले.