साकोली: साकोली सेंदूरवाफा शहरातील निवडणूक संदर्भातील बॅनर एक डिसेंबरला रात्री दहापूर्वी काढण्याचे मुख्याधिकारी यांचे आदेश
साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदेची निवडणूक उद्या मंगळवार दि.2 डिसेंबरला सकाळी7ते सायंकाळी5.30 या वेळात घेण्यात येणार आहे त्यामुळे सर्व उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी शहरात लावलेले निवडणूक संदर्भातील पोस्टर्स, बँनर,स्टिकर्स, सर्व साहित्य हे सोमवार दि.1 डिसेंबरला रात्री दहा पूर्वी काढण्याचे आदेश साकोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश वासेकर यांनी सोमवार दि1डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता दिले आहेत