माण: पूर परिस्थितीला कारणीभूत ठरलेली म्हसवड शहरातील अतिक्रमणे प्रशासनाने युद्धपातळीवर हटवली; नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास
Man, Satara | Sep 28, 2025 माण तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या म्हसवड शहरात जोरदार पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडवर आलेल्या महसूल आणि नगरपालिका प्रशासनाने रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून एसटी बस स्थानक ते शिंगणापूर चौक परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम युद्धपातळीवर राबवली. प्रशासनाच्या या भूमिकेचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले असून सुटकेचा निश्वास सोडला आहे. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर म्हसवड शहरात पूर परिस्थितीमुळे व्यापारी आणि व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरले होते.