सार्वजनिक सेवा सुविधांसाठी राखीव भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून हडपसर येथील एका डॉक्टरची २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी माजी नगरसेविकेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माजी नगरसेविका प्राची आल्हाट, त्यांचे पती अशिष आल्हाट, चिंतामणी कुरणे (रा. महंमदवाडी) आणि आसिफ शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे.