दिग्रस: हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षणासाठी दिग्रस येथे बंजारा समाजाचा विराट मोर्चा, तहसीलदारामार्फत शासनाला पाठविले निवेदन
महाराष्ट्र शासनाने नुकतेच मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर बंजारा समाजालाही हैदराबाद गॅजेटमधील तरतुदीनुसार एसटी आरक्षण द्यावे, अशी मागणी बंजारा आरक्षण कृती समिती दिग्रसने केली. यासाठी आज सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान दिग्रस येथे बंजारा समाज बांधव व भगिनींच्या मोठ्या उपस्थितीत विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून झाली. शेवटी तहसीलदारांना निवेदन दिले.