नागपूर ग्रामीण: नातीच्या वाढदिवसाचा आनंद विरला: भरधाव कारच्या धडकेत आजी आजोबांचा जागीच मृत्यू, बेलतरोडी हद्दीत भीषण अपघात
आपल्या नातीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून आनंदाने घरी परतणाऱ्या एका ज्येष्ठ दांपत्यावर काळाने घाला घातला आहे. बेल्तरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ९ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन सुरेश कळंबे यांच्या मुलीचा वाढदिवस 'आहान सेलिब्रेशन हॉल', खरबी रोड येथे होता. या कार्यक्रमासाठी त्यांचे सासरे विजय भगवान सावरकर आणि सासू सौ. सुरेखा विजय सावरकर आले होते