अकोला : जनता कापड बाजार चौकात दिनांक 22नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता प्रचंड ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली. ऑटोचालक आणि हातगाडीवाल्यांच्या उघड अतिक्रमणामुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. याठिकाणी ना ट्रॅफिक पोलिसांचे नियमन, ना मनपाची अतिक्रमण मोहीम—परिणामी नागरिक त्रस्त झाले असून तात्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे.