तुमसरचे तहसीलदार पथकासह मौजा चारगाव येथे गस्त घालत असताना, त्यांना दिनांक 17/11/2025 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करताना एक टिप्पर आढळला. नेहाल बालगोपाल दुरुगकर (वय 33, रा. शहापूर, ता+जि भंडारा) हे टिप्पर क्र. MH-40-DC-1845 चालवत होते. तपासणी केली असता, या टिप्परमध्ये अंदाजे 10 ब्रास (किंमत 60,000 रु.) रेती भरलेली होती आणि चालकाकडे असलेल्या वाहतूक परवान्याची मुदत संपलेली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, विनापरवाना अवैध वाहतूक केल्याबद्दल टिप्पर (35,00,000 रु.) आणि