जळगाव जामोद: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील तहसील चौकात चटणी भाकर खाऊन आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दिवाळीच्या दिवशी शहरातील तहसील चौकात चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले. निवडणुकीच्या वेळी राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, तसेच विविध आश्वासने दिली होती मात्र शासन स्थापन होऊन सुद्धा शासनाने ती पूर्तता केली नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शासनाच्या निषेध करून काळी दिवाळी साजरी करण्यात आली.