वर्धा: सरकारचे अनुदान कर्ज खात्यात वळती;बँक मॅनेजरवर कारवाईची सावली येथील शेतकऱ्यांची मागणी
Wardha, Wardha | Oct 25, 2025 सावली येथील शेतकरी पंकज पिसूड्डे यांनी सरकारकडून मिळालेली अनुदानाची रक्कम थेट कर्ज खात्यात वर्ग केल्याचा आरोप पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापकावर केला आहे. रक्कम रोख देण्याऐवजी कर्जात समायोजन करण्यात येत असून यामुळे शेतकऱ्यांना आणखी आर्थिक अडचणीला समोरे जावं लागत असल्याचे पिसूड्डे यांचे म्हणणे. या प्रकरणात बँक मॅनेजरवर कारवाई न झाल्यास सोमवारी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.