वाघुर नदीच्या पात्रात बुडाल्याने दिलीप पाडुरंग मोरे वय ४१, रा. बेळी, ता. जळगाव या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दिलीप मोरे हे घरातून बाहेर पडले होते. ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा दोन दिवस कसून शोध घेतला, मात्र त्यांचा तपास लागत नव्हता. अखेर शनिवारी ८ नोव्हेंबर रोजी त्यांचा सकाळी १० वाजता मृतदेह वाघुर नदीच्या पात्रात आढळून आल्याने बेळी गावावर शोककळा पसरली आहे.