मालेगाव: मालेगाव–सुरत महामार्गावर शेतकऱ्यांनी वाहतूक रोखली, कांदा भावातील घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा महामार्ग रोको
मालेगाव–सुरत महामार्गावर शेतकऱ्यांनी वाहतूक रोखली, कांदा भावातील घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा महामार्ग रोको Anc: कांदा भाव प्रश्नी शेतकऱ्यांचा एल्गार करत, डोक्यावर काळ्या फिती, रस्त्यावर कांदे फेकून घोषणाबाजी करत आज दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान मालेगाव–सुरत महामार्गावर शेतकऱ्यांनी वाहतूक रोखली. उन्हाळी कांदा लाखो रुपये खर्चून पिकवला, ५ महिन्यांपासून चाळीत साठवला "भाव वाढेल" या आशेवर कांदा जपला; मात्र सरकारच्या धोरणामुळे मातीमोल झाला.