जालना: जालना तालुका पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई; तीन ठिकाणी छापे, मोठा साठा जप्त
Jalna, Jalna | May 23, 2026 जालना जिल्ह्यात अवैध दारू विक्रीविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत तीन ठिकाणी छापे टाकून अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. शनिवार दि. 23 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत तीन आरोपींविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या कारवाईत पाचनवडगाव येथे मीरा शत्रुघ्न गायकवाड या महिलेवर कारवाई करण्यात आली.तीच्या ताब्यातून हातभट्टी दारू जप्त केली.