भंडारा: 'तू आगाऊ बोलतोस' म्हणत तरुणावर चाकूहल्ला; भंडारा शहरात खळबळ! मिस्कीन टँक गार्डन जवळील घटना
'तू आगाऊ बोलतोस' या कारणावरून झालेल्या वादातून दोन आरोपींनी एका १९ वर्षीय तरुणावर धारदार चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना भंडारा शहरात मिस्कीन टँक गार्डनजवळ दि. २१ ऑक्टोंबर रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील फिर्यादी फराज फिरोज शेख (वय १९, रा. अशरफी नगर, तकिया वार्ड, भंडारा) हा त्याचा मित्र आदित्य सोनवाने याला भेटण्यासाठी मिस्कीन टँक गार्डन जवळील फुला.