भोकरदन: वडोदा तां.येथे संतप्त शेतकऱ्याने1एकर मिरचीची झाडे टाकली उपटून,बाजारपेठेत भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त
आज दिनांक 7 जुलाई 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वडोदा तांगडा येथील मिरची उत्पादक अल्पभूधारक शेतकरी समाधान कळम यांनी त्यांच्या शेतात उन्हाळ्यामध्ये लावलेली हिरवी मिरचीची झाडे आता उपटून टाकली आहे,कारण या मिरचीला मिरच्या जरी लागल्या असल्या मात्र बाजारपेठेत हजार पंधराशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत नसल्यामुळे लागवड केलेला खर्चही निघत नाही, त्यामुळे या शेतकऱ्याने आपला संताप व्यक्त करत 1 एकर मिरचीची झाडे उपटून टाकली आहे.