लाखनी: निमगाव ते मुरमाडी रोडवर अवैध रेती वाहतूक; ₹८.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त, चालकाविरुद्ध गुन्हा
लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या शुभम सुनील बोंदरे (रा. मोगरा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता दरम्यान मौजा निमगाव ते मुरमाडी रोडवर जॉन डियर ट्रॅक्टर (MH ३६ AI २७८५) आणि ट्रॉलीमध्ये १ ब्रास रेती विना परवाना वाहतूक करताना तो आढळला. ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेतीसह एकूण रु. ८,२५,०००/- किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून महसुली कारवाईसाठी पालांदूर पोस्टे येथे डिटेन केला आहे. ग्राम महसूल अधिकारी सुनील कासराळे..