चोपडा: अकुलखेडा रोडवरील बिकानेर स्वीटमार्ट समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार,चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Chopda, Jalgaon | Oct 19, 2025 चोपडा शहरातून अकुलखेडा जाणारा रोड आहे. या रोडावर बिकानेर स्वीट मार्ट आहे. येथे हर्षल मधुकर नाथबुवा वय ३२ हा तरुण होता. त्याला कोणीतरी अज्ञात वाहनाने धडक दिली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.