चंद्रपूर: जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे अद्यावत सुविधा असलेल्या ई - लायब्ररीचे थाटात लोकार्पण
विदर्भातील शिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा व प्रशासकीय सेवेत उच्च स्थानी येथील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करावे हा त्यामधील हेतू आहे असे प्रतिपादन विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथील तहसील कार्यालयाच्या मागील परिसरात १० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या ई-लायब्ररीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आज दि १ नोव्हेंबर ला १२ वाजता ते बोलत होते.