स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा घातला. तसेच स्पा सेंटर चालविणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पुनावळेत करण्यात आली. पोलिसांनी ४१ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.