महाड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षातील गळती सुरूच असून त्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आज रविवारी राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक काका वैष्णव यांचे सुपुत्र पलाश वैष्णव यांनी शिवसेनेच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत सहकारी नीरज चौधरी व सागर कारेकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे महाड शहरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, निवडणुकीपूर्वी पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. यावेळी माजी नगरसेवक सुनिल अगरवाल, ॲड. सनी जाधव, तालुका प्रमुख बंधू तरडे, आशिष चिखले, समीर बुटाला, युवा उद्योजक नारायण गुजर, प्रथमेश डोळस, शुभम कांबळे, वैभव पयेलकर, स्वराज बुटाला, प्रकाश टपरे, सागर पोटे तसेच महाड शहरातील शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.