उत्तर सोलापूर: सीना नदी परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन : आमदार सुभाष देशमुख...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी नदीकाठच्या सर्व नागरिकांनी आपल्या परिवारासह तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी सोमवारी दुपारी १२ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. नदी परिसरातील लहान मुलांनी नदीकाठी जाण्याचा प्रयत्न करू नये, याबाबत पालकांनी विशेष लक्ष ठेवावे.