समृद्धी महामार्गाच्या 'झिरो माईल' सर्कलवर गुरुवारी दुपारी लोखंडी अँगलने भरलेला ट्रेलर अनियंत्रित होऊन पलटी झाला. या अपघातात चालक विनय हेमलाल जामुनपाने (२३) गंभीर जखमी झाला.मिळालेल्या माहितीनुसार, चालक बुटीबोरीकडे जात असताना वळणावर गाडीचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलरने बॅरिकेट्सला धडक दिली.