शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नेर पिंगळाई येथे, जुन्या वादातून झालेल्या भांडणात शिवीगाळ करीत लाथा भुक्क्यांनी मारून लाकडी काठीने जखमी केल्याची घटना दिनांक 24 डिसेंबरला रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली आहे. याबाबतीत नेरपिंगळाई येथील प्रकाश नथुजी श्रीखंडे यांनी दिनांक 25 डिसेंबरला सकाळी सात वाजून 21 मिनिटांनी शिरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. शिरखेड पोलिसांनी विलास चतुर्भुज यांचेवर गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे