अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काळवटी तलावात बेपत्ता झालेले विश्वनाथ बुरांडे यांचा मृतदेह तब्बल चार दिवसांनी आज पाण्यात आढळून आला आहे. गुरुवार दि. १८ डिसेंबर रोजी नियमित पोहण्यासाठी तलावात उतरलेले विश्वनाथ बुरांडे पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती.या घटनेनंतर परळी, बीड आणि मालवण येथील आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथकाकडून सलग चार दिवस शोधमोहीम राबविण्यात येत होती. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे मृतदेहाचा शोध लागत नव्हता. अखेर आज रविवार दि.21 डिसेंबर रोजी चौथ्या दिवशी सकाळी, 8 च्या सुमारास त्य