भंडारा आणि तुमसर नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने आपली पकड मजबूत केली आहे. भंडारा येथून उषा नंदनवार तर तुमसर येथून वैशाली हिंगणे यांनी नगरसेविका पदी शानदार विजय मिळवला आहे. या घवघवीत यशाबद्दल शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान दोन्ही नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले. "जनतेने दाखवलेल्या या अभूतपूर्व विश्वासाला सार्थ ठरवत, दोन्ही नगरसेविका आपल्या प्रभागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने कार्य करतील...