भारतीय संस्कृतीचा अभिमान जागृत करणे आणि राष्ट्र सर्वोपरी हे ब्रीद घेऊन, सुखमय व सुसंघटित समाज निर्मितीसाठी कटिबद्ध असलेल्या राष्ट्र सेविका समितीच्या वतीने पनवेलमध्ये शिस्तबद्ध सघोष संचलन आयोजित करण्यात आले होते. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या या संचलनात पेण, पनवेल, खालापूर आणि उरण या चार तालुक्यांतील १७९ सेविकांनी पूर्ण गणवेशात सहभाग नोंदवला. या प्रसंगी समितीच्या ९ दशकांच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेत महिला शक्तीला राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.