अचलपूर: सुर्यकमल हॉटेलजवळ तरुणावर लोखंडी फायटरने हल्ला; आरोपीं विरोधात गुन्हा दाखल
परतवाडा येथील सुर्यकमल हॉटेलच्या मागील ग्राऊंडवर रविवारी रात्री एका तरुणावर लोखंडी फायटरने हल्ला करून गंभीर दुखापत करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम कुंजीलाल सेंगर (वय 31, रा. पेन्शनपुरा, परतवाडा) हा मित्रासह 14 सप्टेंबर रोजी रात्री 10 ते 10.30 वाजताच्या दरम्यान ग्राऊंडवर बसला होता. तेव्हा तेथून तीन लहान मुले जात होती. फिर्यादीने त्यांना एवढ्या रात्री रस्त्यावर फिरू नये, असे सांगितल्यामुळे ते निघून गेले. काही वे