जालना: संजय नगरमधील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त; आयुक्त अंजली शर्मा यांनी लक्ष देण्याची मागणी
Jalna, Jalna | May 20, 2026 जालना : जालना महानगरपालिकेकडून शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना जुना जालना येथील संजय नगर, वॉर्ड क्र. ११ मधील वाढत्या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबत नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. संजय नगर परिसरातील रस्ते आधीच अरुंद असताना काही नागरिक आणि व्यावसायिकांनी रस्त्यावर कायमस्वरूपी वाहने उभी केल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी फोर-व्ह