उत्तर सोलापूर: शिरपूरसो येथे प्रशासनाकडून जनावरांसाठी मुरघास वाटप: सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांची माहिती...
मोहोळ तालुक्यातील शिरपूरसो परिसरातील शेतकऱ्यांना मंगळवारी मोहोळ प्रशासनाकडून तीन दिवसांचा मुरघास वाटप करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याची कमतरता भासत असल्याने दिलासा देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिली. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांचे आभार मानले आहेत.